काय सांगता, पुणे एअरपोर्टची अवस्था एसटी स्टँडपेक्षाही भयानक!

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची अवस्था एसटी स्टॅंडपेक्षाही वाईट झाल्याचे वास्तव एका घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे. येथील उपाहारगृहातील अस्वच्छतेमुळे एका डॉक्टरांना पोटाचा संसर्ग झाला.

Pune International Airport

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील डॉक्टरांना वाईट अनुभव, अस्वच्छतेमुळे उपाहारगृहात खाल्ल्यावर पोटात संसर्ग, थेट विमानतळ प्रशासनाकडे केली तक्रार

नोझिया सय्यद 
पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची (Pune International Airport) अवस्था एसटी स्टॅंडपेक्षाही वाईट झाल्याचे वास्तव एका घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे. येथील उपाहारगृहातील अस्वच्छतेमुळे एका डॉक्टरांना पोटाचा संसर्ग झाला. त्यांनी याबाबत विमानतळ प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

ज्येष्ठ  हृदयरोगतज्ज्ञ डॉ. समीर भाटे यांनी पुणे ते दिल्ली या प्रवासादरम्यान त्यांना कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागले, याची माहिती ‘सीविक मिरर’ला दिली. ते म्हणाले, ‘‘सोमवारी (दि. ३१ मार्च) सकाळी ६ वाजता दिल्लीला जाणाऱ्या विमानाची वाट पाहात होतो. यावेळी उपाहारगृहात खाण्यासाठी गेलो. मात्र, येथे प्रचंड अस्वच्छता होती.  पुणे विमानतळावर अशा प्रकारची सेवा अत्यंत दुर्दैवी आहे. येथील जेवण बेचव तर होते पण अत्यंत अस्वच्छही होते. याच जेवणामुळे मी आजारी पडलो. अन्नातून विषबाधा झाल्याने माझी प्रकृती बिघडली.’’

 पुणे विमानतळ प्राधिकरणाकडे मी तातडीने तक्रार दिली. या ठिका  णी मूलभूत स्वच्छतेचाही अभाव होता. प्रचंड गर्दी होती मात्र त्या प्रमाणात कटलरी नव्हती. अगदी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे यापेक्षा चांगली स्वच्छता ठेवली जात असेल. उपाहारगृहाच्या स्वयंपाकघरात डोकावण्याचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरातील सुविधा तर धक्कादायक होत्या. विमानतळ अधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कारवाई करावी. आरोग्य आणि सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी  लाउंज किचनची संपूर्ण तपासणी करावी. स्वच्छतेचे ऑडिट करावे, अशी मागणीही यावेळी डाॅ. भाटे यांनी केली.

यासंदर्भात ‘सीविक मिरर’कडे प्रतिक्रिया देताना पुणे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके म्हणाले, ‘‘सोमवारी सकाळी याबाबत  तक्रार आली आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.  या समस्येचे निराकरण करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. प्रवाशांना अशा प्रकारचा अनुभव पुन्हा येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest