संग्रहित छायाचित्र
भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार ते बुधवार (दि. २१ ते २३) या कालावधीत अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी या कार्यक्रमांची माहिती दिली.
अयोध्येत प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे राहात आहे. या मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि. २२) होणार आहे. त्या निमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातही श्री प्रभू रामाची आणि गणपतीची आरती, महाआरती, भजन, रामरक्षा पठण, दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे पुनीत बालन यांनी केले आहे.
असे असणार कार्यक्रम
२१ जानेवारी :
सकाळी ८:३० - महाआरती
सकाळी ११ - श्रीराम पथकाकडून आरती
दुपारी १२ - भजन
दुपारी ३ - बीवीआय, पुणे रामरक्षा पठण
सायंकाळी ५:३० - रामरक्षा पठण आणि राम नाम जप
रात्री ८ - महाआरती
------------
२२ जानेवारी
सकाळी ६:३० ते ८ रामरक्षा पठण (११ वेळा व राम जप (१००८))
सकाळी ८:३० - महाआरती
सकाळी ९:३० ते ११ शहरातील राम मंदिरात मानाचे ताट अर्पण
सकाळी ११ ते १ - रामलल्ला मूर्तीच्या विधिवत प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण (ध्वनिचित्रफीत)
दुपारी १२:३० ते १:३० ढोल ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना सोहळा
दुपारी १:३० ते ४ - श्री विष्णुयाग
सायंकाळी ६:३० - ७:४५ दीपोत्सव
रात्री ८ - महाआरती
-----------
२३ जानेवारी
- सायंकाळी ४ ते ६ मंदिरात समर्थ रामदास पादुका दर्शन
- सायं ६.३० ते ८ पुणे विद्यार्थी गृहाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून श्री राम रक्षा आणि हनुमान चालीसा पठण
अयोध्येत होत असलेला रामलल्ला प्रतिष्ठापनेचा सोहळा ऐतिहासिक असणार आहे. कोट्यवधी देशवासियांचे स्वप्न साकार होत आहे. यानिमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुढील तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-पुनीत बालन, उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट