Surendra Pathare Foundation : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धांच्या सामन्यांनी जिंकली उपस्थितांची मने

'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'च्या (Surendra Pathare Foundation) वतीने २७ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया २०२३’ या क्रीडा महोत्सवात २ व ३ डिसेंबर रोजी व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप, टेबल टेनिस चॅम्पियनशीप,

Surendra Pathare Foundation

सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या क्रीडा महोत्सवातील विविध स्पर्धांच्या सामन्यांनी जिंकली उपस्थितांची मने

खराडी, पुणे : 'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन'च्या (Surendra Pathare Foundation) वतीने २७ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया २०२३’ या क्रीडा महोत्सवात २ व ३ डिसेंबर रोजी व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप, टेबल टेनिस चॅम्पियनशीप, कॅरम चॅम्पियनशीप, बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशीप, स्विमिंग चॅम्पियनशीप तसेच स्केटिंग चॅम्पियनशीप या विविध स्पर्धा संपन्न झाल्या. खराडी येथील स्पोर्टसेज, पठारे स्टेडियम, फाऊंटेन रोड या ठिकाणी या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या सर्वच स्पर्धांमध्ये खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी, धानोरी, येरवडा, लोहगाव येथील विविध सोसायटीतील संघानी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. मागील वर्षीदेखील सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या या क्रीडा महोत्सवाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. 

पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात क्रीडा संस्कृती रुजावी तसेच अनेक उदयोन्मुख खेळाडू तयार व्हावेत व त्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळावा, या उद्देशाने सुरू केलेला हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या सुरू आहे. 

ज्या उद्देशाने हा क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे तो उद्देश येणाऱ्या काळात नक्की सफल होईल, यात शंका नाही. आजही ‘एसपीएफ स्पोर्ट्स मेनिया’ मधून तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या विविध क्रीडा उपक्रमांतून पुढे आलेले खेळाडू विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागरिक पुन्हा एकदा विविध क्रीडा प्रकारांशी स्पर्धक म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून जोडले जाताय आणि याचा फार आनंद होतोय, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष ‘सुरेंद्र बापूसाहेब पठारे’ यांनी व्यक्त केले.      

नुकत्याच पार पडलेल्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत ३०० स्पर्धेक तर टेबल टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत २५० स्पर्धेकांनी , कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धेत २३०, बॉक्स फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत ६०० स्पर्धेकांनी , स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत २५० स्पर्धेक , स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ५०० स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. एकूणच सर्वच संघांनी व खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे उत्तम प्रदर्शन करत सामान्यांमध्ये रंगत आणली. प्रेक्षक नागरिकांना देखील या निमित्ताने चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. एकूणच एसपीएफ क्रीडा महोत्सवात ५०००हून अधिक स्पर्धेकांनी सहभाग घेतला आहे.

'एसपीएफ स्पोर्ट मेनिया'च्या रूपाने सांस्कृतिक राजधानी असलेल्या आपल्या पुण्यात स्विमिंग (जलतरण), स्केटींग, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बॉक्स फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन व क्रिकेट या मैदानी क्रीडा प्रकारांबरोबरच बुद्धिबळ, कॅरम या बैठी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन होत आहे आणि ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. तसेच, क्रीडाप्रेमी प्रेक्षकांसाठी व खेळाडूंसाठी ही एक पर्वणी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest