पुणे : लेक हरवलेली पण...! पुणेकरांचे ऑनलाईन स्टेट्स अन् ऑफलाईन पोलीस आयुक्त; काही तासातच चिमुकली आईच्या कुशीत

सोशल मीडिया आणि पोलीस यांच्या नावाने सर्रास खडे फोडले जातात. त्यांच्या नावाने कायम बोंबा असतात. मात्र याच दोघांच्या अॅक्शन मोडमुळे पुण्यातील एक चिमुकली थेट आई- वडिलांच्या कुशील परतली आहे.

Pune Police

लेक हरवलेली पण...! पुणेकरांचे ऑनलाईन स्टेट्स अन् ऑफलाईन पोलीस आयुक्त; काही तासातच चिमुकली आईच्या कुशीत

पुणे : सोशल मीडिया आणि पोलीस यांच्या नावाने सर्रास खडे फोडले जातात. त्यांच्या नावाने कायम बोंबा असतात. मात्र याच दोघांच्या  अॅक्शन मोडमुळे पुण्यातील एक चिमुकली थेट आई- वडिलांच्या कुशील परतली आहे. ज्यांच्या नावाने कायम खडे फोडले जातात तेच आज या चिमुकलीसाठी आणि तिच्या पालकांसाठी देवदूत ठरले आहेत. आई रागावल्याने घरातून निघून गेलेली 12 वर्षीय चिमुकली या सोशल मीडियाच्या योग्य वापरामुळे आणि महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांच्या तगड्या इच्छाशक्तीमुळे आई-वडिलांच्या कुशीत विसावली आहे. (Pune News) 

आई-वडील रागावल्यामुळे १२ वर्षाची मुलगी घरातून निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. पुण्यातील नांदेड सिटी येथून काल गुरुवार दिं. १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही मुलगी घरातून निघून गेली होती. उशिरापर्यंत मुलीचा पत्ता लागत नसल्यामुळे कुंटूबीयांनी पोलीसात धाव घेतली सोबतच हरवलेल्या १२ वर्षांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला. दरम्यान पुणे पोलीसांना (Pune Police) मुलगी मिसिंग (Girls Missing)  असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली विषेश म्हणजे या मुलीच्या शोधासाठी स्वत: पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) रस्त्यावर उतरले. सोशल मीडियाचा आधार अन् पुणे पोलीसांच्या संवेदनशील तपासामुळे अखेर १२ वर्षीय मुगली आई-वडिलांच्या कुशीत विसावली. मुलीच्या शोधासाठी हजारो पुणेकरांनी मिसिंगचे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवत मदत केली.  

आई-वडील रागाल्यामुळे पुण्यातील नांदेड सिटीतील विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी १२ वर्षीय मुगली ही दुपारी २ वाजताच्या सुमारास घरातून निघून गेली. घरातून बाहेर पडलेली मुलगी संध्याकाळ झाली तरी परत आली नसल्यामुळे तिचा शोध आई-वडिलांनी घेण्यास सुरुवात केली. मुलगी कुठेच मिळत नसल्यामुळे कुंटूंबीयांनी पोलीसात धाव घेतली तसेच मुलगी मिसिंग असल्याची माहिती व फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केला. त्यानंतर ही माहिती शिवाभाऊ पासलकर यांच्या महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन ग्रुपवर ही आली. तेव्हा लागलीच पासलकर यांनी मुलीच्या कुंटूंबीयांची परवानगी घेत मुलगी हरवल्याची माहिती त्यांच्या ग्रुपवर व्हायरल केली. हा मेसेज वाऱ्यासारखा शहरभर पसरला आणि हजारो पुणेकरांनी या मुलीचे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले. याच दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा आयुक्तांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावत स्वत: मुलीचा शोध घेण्यासाठी आयुक्त रस्त्यावर उतरले. 

असा लागला शोध

१२ वर्षीय ही मुलगी घराबाहेर पडल्यानंतर सुरुवातीला २ वाजता नांदेड सिटीतील डेस्टीनेशन सेंटवर गेली तिथे तिने आईसक्रीम खाली. त्यानंतर ती रिक्षाने स्वारगेटला गेली तेथून तिने आळंदी गाठले. आळंदीतून रिक्षाने ती आळंदी फाटा येथे आली तेथून दुसऱ्या रिक्षाने वाघोलीत आली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन ग्रुपवरचे मुलगी मिसिंगचे पोस्टर सर्वत्र व्हायरल झाले होते शिवाय पोलीस व मुलीचे कुंटूंबीय सु्द्धा तिचा शोध घेत होते. यादरम्यान या मुलीने वाघोलीतील मुख्य चौकात असलेल्या 'जय महाराष्ट्र' येथे वडापाव खाल्ला यावेळी या वडापाव विक्रेत्याकडे व्हायरल झालेले मिसिंगचे पोस्टर आले होते. तेव्हा त्याने आपल्याकडे ही मुलगी आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन ग्रुपचे पासलकर यांना दिली. पालसकर यांनी लागलीच जय महाराष्ट्र वडापाव गाठले मात्र तोपर्यंत ही मुलगी तेथून निघून गेली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन ग्रुपच्या सदस्यांनी या मुलीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा रांजणगाव येथून पासलकर यांना एका शिपायाचा फोन आला त्यांनी मुलगी रांजणगावात सुखरूप असल्याची माहिती दिली. यावेळी पासलकर यांनी पोलीसांना माहिती दिली त्यावेळी स्वत:पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून खात्री करून घेलती त्यानंतर सर्वांनी सुटकेचे श्वास सोडला. 

चिमुकलीच्या शोधासाठी स्वत: पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर

१२ मुलगी मिसिंग झाल्याची माहीती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार मुलीचा शोध घेण्यासाठी रस्त्यावर उतरले. आयुक्त स्वत:वाघोतील दाखल झाल्यामुळे परिसरात मोठा पोलीसांचा फौजफाटा दाखल झाला होता. यावेळी आयुक्तांनी मुलीचा शोध घेणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षिस देखील जाहिर केले होते. दरम्यान या घटनेवरून पुणे पोलीसांची संवेदनशिलता पुणेकरांना बघावयास मिळाली. यावेळी पुणे पोलीसांवर कौतुकांचा वर्षाव पुणेकरांनी केला. 

१२ वर्षीय मिसिंग मुलगी आपल्या आई-वडीलांच्या कुशीत विसावली हे महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन ग्रुपच्या सर्व सदस्यांमुळे शक्य झाले. आतापर्यंत आम्ही ३८३ मिसिंग केसेस या ग्रुपच्या माध्यमांतून मार्गी लावल्या आहेत. यापुढेही आपण असेच काम या ग्रुपच्या माध्यमातून करणार असल्याचे शिवाभाऊ पासलकर (महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन ग्रुप अध्यक्ष) यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest