येरवडा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल

पुण्यातील येरवडा खुले कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कारागृह अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Wed, 2 Aug 2023
  • 01:50 pm
Yerawada jail : येरवडा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

मानसिक स्थिती ठिक नसल्याने केला प्रयत्न

पुण्यातील येरवडा खुले कारागृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कारागृह अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय राजाराम दिघे असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी कारागृहाच्या वतीने निशा दिलीप कुमार श्रेयकर (वय ३२ ,रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैदी धनंजय दिघे हा सध्या येरवडा खुले कारागृहात शिक्षा भोगत आहे. मानसिक स्थिती ठीक नसल्याने तो येरवडा खुले कारागृह मुद्रणालय येथील मागील बाजूस पाण्याच्या हौदाजवळ गेला. तेथे पडलेल्या एका खराब ब्लेडने त्याने स्वतःच्या डाव्या हातावर मारून घेतले.

यामध्ये धनंजय गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कैद्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest