सुवर्णयुग मित्र मंडळाच्या वतीने श्रीरामनवमी उत्साहात साजरी

पुणे: शहरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या आनंदात पार पडला. शहराच्या विविध भागांत श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सुवर्णयुग मित्र मंडळाच्या वतीने श्रीरामनवमी उत्साहात साजरी

पुणे: शहरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या आनंदात पार पडला. शहराच्या विविध भागांत श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी मिरवणूका निघाल्याचे देखील बघायला मिळाले. 

दरम्यान, गोंधळेनगर हडपसर येथील सुवर्णयुग मित्र मंडळ यांच्या वतीने श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दुपारी श्रीराम मूर्तिपूजन करण्यात आले. तसेच रात्री महिलांच्या हस्ते सामूहिक श्रीराम आरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच  श्रीरामांची वेशभूषा करून आलेल्या लहान मुलांना आकर्षक भेटवस्तूही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संतोष पांढरे,  आमदार चेतन तुपे (पाटील), माजी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मा. नगरसेवक योगेश ससाणे , माजी महापौर वैशाली सुनिल बनकर , मारुती आबा तुपे , तेजस शेठ गोंधळे, जीवन जाधव, हेमंत वाडकर हे उपस्थित होते. 

तर कार्यक्रमाचे आयोजन आकाश गोंधळे, सागर डांगमाळी, तुषार होले, संतोष खटके, राहुल पोटे, समीर गायकवाड, कपिल पवार, विक्रम भुजबळ, हेमंत खेडेकर, विकास गवळी यांनी केले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest