Pune : महापालिकेच्या बुडाशी धुराचे लोट, डेंगळे पुलाखाली कचरा जाळल्याने मनपा बस स्थानकापर्यंत पसरला धूर

महापालिकेच्या अगदी हकेच्या अंतरावरील डेंगळे पुलाखाली मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा जाळ जात आहे. कचरा जाळल्यामुळे मनपा बस स्थानकापर्यंत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

Pune : महापालिकेच्या बुडाशी धुराचे लोट, डेंगळे पुलाखाली कचरा जाळल्याने मनपा बस स्थानकापर्यंत पसरला धूर

महापालिकेच्या बुडाशी धुराचे लोट, डेंगळे पुलाखाली कचरा जाळल्याने मनपा बस स्थानकापर्यंत पसरला धूर

वाढत्या वायू प्रदूषणास लागला हातभार

पुणे : महापालिकेच्या अगदी हकेच्या अंतरावरील डेंगळे पुलाखाली मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा जाळ जात आहे. कचरा जाळल्यामुळे मनपा बस स्थानकापर्यंत धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

शहरातील हवा प्रदूषण वाढल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश तसेच मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात हवा प्रदूषण बांधकामांमुळे होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र उघड्यावर कचरा जाळल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे त्यात मोठी भर पडत आहे. उघड्यावर कचरा जाळण्यात येऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र तरीही कचरा जाळण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात पालिकेने ११४ जणांवर कारवाई करुन ६७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महापालिकेकडून हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. बांधकामांमुळे शहरात हवा प्रदूषण होत असल्याने बांधकाम व्यवसायिकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. मात्र उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश तसेच मार्गदर्शन सूचनांचे पालन होत नसल्यास महापालिकेने कारवाई करणे आपेक्षित आहे.

कचरा टाकणे व जाळणे याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र महापालिकेच्या कारवाया थंड पडल्याचे दिसून येत होते. त्यावर मागच्या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. बैठकीत सूचना दिल्या प्रमाणे महापालिकेच्या सर्वच विभागाकडून कारवाई तीव्र करण्यात आल्या आहेत. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कचरा जाळण्यात येऊ नये यासाठी घनकचरा विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कडक कारवाई करण्यात येत असली तरी महापालिकेच्या नाकावर टिच्चून कचरा जाळला जात आहे.

अग्निशमन केंद्राच्या जवळ कचऱ्याला भीषण आग..

भवानी पेठेतील अग्निशमन केंद्राच्या जवळील न्यू टिंबर मार्केट येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात लाकूड साठा आणि कचरा साठवण्यात आला होता. या साठ्याला सोमवारी (ता.४) सायंकाळी साडेपाच वाजता आग लागण्याची घटना घडली. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला समजताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचे काम केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest