रणसंग्राम २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मनसेत नाराजीनाट्य?

पुणे लोकसभेसाठी (Pune Loksabha 2024) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेचा लोकसभेचा चेहरा म्हणून वसंत मोरे (Vasant More) तयारी करत आहेत. शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनीही उघडपणे

Pune Lok Sabha 2024

पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मनसेत नाराजीनाट्य?

वसंत मोरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट

तानाजी करचे

पुणे लोकसभेसाठी (Pune Loksabha 2024) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसेचा लोकसभेचा चेहरा म्हणून वसंत मोरे (Vasant More) तयारी करत आहेत. शहराध्यक्ष  साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनीही उघडपणे  लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे  व्यक्त केली होती. त्यातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना वरच्या पदावर बसलेलं पाहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, असे म्हटल्याने वसंत मोरे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. (MNS Pune)

वसंत मोरे यांनी मंगळवारी (दि. २७) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने या चर्चेत आणखीनच भर पडली. मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातील कामासाठी ही भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Vasant More meets Sharad Pawar)

मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पक्षाकडून पुणे लोकसभेच्या तयारीची जबाबदारी दिली गेली  आहे. यामुळे अमित ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहेत. हे पाहता पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मनसे ताकदीने लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसंत मोरे हे  २००२ पासून  शिवसेनेत  काम करत  होते. पुढे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर  त्यांच्यासोबत वसंत मोरेदेखील बाहेर पडले. त्यांनी २००७ मध्ये पहिल्यांदा मनसेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली आणि निवडून आले. त्यावेळी मनसेचे  पुण्यामध्ये ८ नगरसेवक होते.  पुढे २०१२ ला  पुन्हा ते नगरसेवक झाले.  त्यावेळी पुण्यामध्ये   मनसेचे  २९ नगरसेवक होते. २०१७ ला सलग तिसऱ्यांदा ते नगरसेवक झाले.

साईनाथ बाबर पूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते होते. २००९ मध्ये त्यांनी मनसेत प्रवेश केला. २०१२ मध्ये त्यांच्या पत्नी आरती बाबर पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आल्या. २०१७ मध्ये ते स्वतः नगरसेवक झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२२ मध्ये पुणे शहर मनसेचे अध्यक्ष केले.

मी राज मार्गावरच : वसंत मोरे

बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या विधानसभा मतदारसंघनिहाय पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होती. यावेळी वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर संपूर्ण शहरात वसंत मोरे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. परंतु मोरे यांनी या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘‘कात्रज डेअरीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत पुणे महापालिका आयुक्तांमार्फत चुकीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यासंदर्भात सह्यांची मोहीम हाती घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेदेखील हा प्रश्न मांडला. पण मार्ग निघाला नाही. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा कात्रज भागात येतो. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यास आलो होतो.  मी राजमार्गावरच असून शरद पवार गटात जाणार नाही.’’

आमच्या पक्षाकडून लोकसभेसाठी एकूण पाच जण इच्छुक आहेत. त्यामध्ये मी स्वतः आहे. माझी लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. पक्षाकडून अजून अधिकृत लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.  पक्ष आमच्यातील ज्या उमेदवाराला तिकीट देईल, त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत .

- साईनाथ बाबर, मनसे शहराध्यक्ष, पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest