ऑगस्टमध्ये पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

राज्यात जुलैमध्ये लावलेल्या दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Sat, 29 Jul 2023
  • 04:42 pm
Rains likely : ऑगस्टमध्ये पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

ऑगस्टमध्ये पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

पुण्यात ३० जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान हलक्या पावसाची शक्यता

राज्यात जुलैमध्ये लावलेल्या दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या आठवड्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आज सांयकाळी घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शहरी भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान आकाश सामान्यता ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण आणि गोव्यात पुढील पाचही दिवस बहुतांशी ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र किणारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest