पोरांची शिक्षा पालकांना! तोडफोड, जाळपोळ करणाऱ्या आरोपींच्या पालकांवर होणार गुन्हे दाखल

एकेकाळच्या शांत पुण्यात आता गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे. कोयता गॅंगची दहशत, वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Koyta Gangs

संग्रहित छायाचित्र

एकेकाळच्या शांत पुण्यात आता गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे. कोयता गॅंगची (Pune Koyta Gang) दहशत, वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वाहनांची तोडफोड करणारे आरोपी हे अल्पवयीन असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांची धिंडदेखील काढण्यात येणार आहे. (Pune Crime News)

यात वाहन तोडफोड प्रकरणाचा पहिला अध्याय पाहायला मिळाला आहे. चंदनगर पोलिसांकडून (Chandannagar Police) वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या गुन्हेगाराची परिसरात धिंड काढण्यात आली. चंदननगर परिसरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी धीरज दिलीप सपाटे याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याची चंदननगर परिसरात धिंड काढण्यात आली. सपाटे आणि त्याच्या साथीदारांनी खराडी परिसरात महिनाभरापूर्वी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, धीरज सपाटे हा महिनाभरापासून फरार होता. त्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची परिसरातून धिंड काढण्यात आली.

या जाळपोळ आणि वाहन तोडफोड प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यांना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला कोणत्या परिसरात अशा घटना घडतात, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यासोबतच ज्या मुलांनी वाहनांची तोडफोड केली आहेत, त्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. पालकांनी मुलांना कसे धडे द्यायचे किंवा शिवाय मुलांवर नियंत्रण कसं मिळवायचं, हे सगळं या पालकांना सांगण्यात येत आहे. (Pune Police News)

 परिसरांवर करडी नजर

पुण्याच्या काही विशिष्ट भागात असे प्रकार घडत असल्याचं आतापर्यंत समोर आले आहे. या भागांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. परिसरात पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे. साधारण तीन वर्षात हे सगळे प्रकार घडले आहेत. याचा अभ्यास केला तर हे सगळे गुन्हेगार किंवा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार नसून ते भुरटे असल्याचं समोर आले आहे .

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest