संग्रहित छायाचित्र
पुणे - आज (दि १२ सप्टेंबर) रोजी दुपारी तीन वाजता एका व्यक्तीने ठोसरपागा येथील घाटावरुन पाण्यात उडी मारली. ही बातमी समजताच अग्निशमन दलाकडून गणेश उत्सवानिमित्त विविध घाटांवर तैनात असलेल्या जवानांनी तातडीने कार्यवाही सुरु केली.
या व्यक्तीने अचानक पाण्यात उडी मारल्याने एकच आरडाओरडा सुरू झाला. जवळच असलेले फायरमन जितेंद्र कुंभार व शैलेश दवणे यांनी जीवरक्षक संदिप शिंदे, कपाल भोईटे, दत्तात्रय चिनके, संतोष गायकवाड यांच्या मदतीने पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला लाईफ जॅकेट व लाईफ रिंग, रस्सी टाकत सुखरुप पाण्याबाहेर काढले.
पाण्यामध्ये उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव संतोष चित्रकुमार विश्वकुमार असल्याचे समजले. पण त्याने पोहता येत नसूनही पाण्यात उडी का मारली याचे कारण समजू शकले नाही.