Kondhwa Fire News : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग; सुदैवाने जिवितहानी नाही

पुणे (१३ जानेवारी) : कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवरील नताशा एनक्लेव्ह या चार मजली इमारतीत पहाटे ३:३२ वाजता दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर ही आग इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 04:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे (१३ जानेवारी) : कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोडवरील नताशा एनक्लेव्ह या चार मजली इमारतीत पहाटे ३:३२ वाजता दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर ही आग इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. आगीची माहिती मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले.

आग दुचाकीपासून सुरू झाली असून ती इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत असलेल्या घरगुती वस्तूंमुळे मोठ्या प्रमाणात पसरली होती. जवानांनी तत्काळ इमारतीतील रहिवाशांची सुरक्षितता तपासून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. त्यांच्या सतर्कतेमुळे आग इमारतीच्या इतर भागात पसरली नाही, तसेच मोठी जिवितहानी टळली.

जवानांनी एका सदनिकेतून गॅस सिलिंडर बाहेर काढला. सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी गळती रोखली. तळमजल्यावरील सलूनचे दुकानही सुरक्षित राहिले. आगीमुळे कोणतीही जिवितहानी झाली नसून वित्तहानीही मर्यादित राहिली.

अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दिपक कचरे, तांडेल निलेश लोणकर, तसेच जवान मोहन सणस, सागर नेवगे, अनुराग पाटील आणि रामराज बागल यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Share this story

Latest