Pune Traffic Update : पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल

गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रोच्या दुमजली उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Wed, 15 Jan 2025
  • 11:29 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रोच्या दुमजली उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. तथापि वाहतूक सुरळीत व सुरक्षित सुरु राहण्याकरीता व वाहतूक कोंडी टाळण्याकरता वाहतूक बदल करण्यात आले आहे. बुधवार, १५ जानेवारीपासून हे बदल लागू होणार आहे. तसे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी काढले आहेत. हे बदल पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे. 

वाहतूकीत पुढील प्रमाणे असतील बदल

बाणेरकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतूक -
बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. राजभवन समोरून (पंक्चर) वाहनांनी वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन  पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.

शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक -
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहने विद्यापीठ चौकातून सरळ औंध रस्त्याने इच्छितस्थळी जातील. 

औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक - 
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने चतु:शृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठाच्या मिलिनयम गेटमधून वळविण्यात येणार आहे. तेथून बाहेर पडणारी वाहने विद्यापीठाच्या आवारातून इच्छितस्थळी जातील.

नागरीकांनी वरील मार्गाचा वापर करावा तसेच वाहतुक कर्मचारी तथा स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

Share this story

Latest