संग्रहित छायाचित्र
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण बारा टप्प्यांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. यापूर्वी नऊ टप्प्यांच्या कामासाठी कंत्राट देण्यात आले आहे. उरलेल्या तीन टप्प्यांच्या कामासाठीच्या निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, दोन टप्प्यासाठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरने तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टने सर्वात कमी बोली लावली आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे.
एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या १२६ किमी लांबीच्या वर्तुळाकार रस्त्याच्या (Ring Road) प्रकल्पाचे पुढील काही दिवसांमध्ये भुमीपूजन होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठीचे भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे.