पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 20 May 2023
  • 03:06 pm
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला निर्णय

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आले.

गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळेसाठी ४.५० कोटी, क्रीडा विकासासाठी १६ कोटी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी ३.१० कोटी निधी देण्यात आला आहे. तसेच राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest