पुणे: पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख यांना सेवारत्न पुरस्कार

पुणे : मुंढवा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार तानाजी देशमुख यांना राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. रक्षक ग्रुपच्या वतीने वानवडी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख यांना सेवारत्न पुरस्कार

पुणे : मुंढवा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार तानाजी देशमुख (Tanaji Deshmukh) यांना राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार (Seva Ratna Award) प्राप्त झाला आहे. रक्षक ग्रुपच्या वतीने वानवडी आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

पोलीस दलात भारती झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावले. तानाजी देशमुख यांनी अनेक संकटकाळात नागरिकांना मदत केली. समाजात पसरलेल्या गैरसमजाचे निराकरण करून अनुचित प्रकार घडण्यापासून रोखले. सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळून त्यांची अनेक कामे मार्गी लावली. त्यांनी अनेक वर्षांपासून खेळाडू घडवण्याचं काम देखील केलं आहे. मुलींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित त्यांना आधार देण्याचे आणि भविष्य उज्ज्वल करण्याचे प्रयत्न देशमुख यांनी केले. ते अनेक शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. कोरोना काळामध्ये त्यांनी गोरगरिबांना, ज्येष्ठ नागरिकांना मदत केली. बेघर झालेल्या जनावरांची देखील मदत केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest