Pune News: पुण्याहून सुरतला थेट विमानसेवा

पुण्याहून सुरतला जाण्यासाठी थेट विमानसेवा नव्हती. त्यामुळे सुरतला जाण्यासाठी अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. आता पुण्याहून सुरतला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध झाली आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे: पुण्याहून सुरतला जाण्यासाठी थेट विमानसेवा नव्हती.  त्यामुळे सुरतला जाण्यासाठी अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. आता पुण्याहून सुरतला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध झाली आहे. इंडिगो एअरलाइन्सने पुणे ते सुरत अशी थेट विमानसेवा सुरू केली असून आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि रविवारी ही विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. ३१ मार्च २०२४ पासून ही विमानसेवा सुरू होत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि त्रासमुक्त प्रवासासाठी ही थेट सेवा लाभदायक ठरणार आहे. विमानसेवेमुळे पुण्याहून सुरतला फक्त एका तासात जाणे  शक्य होणार आहे. परतीच्या प्रवासाला फक्त ५५  मिनिटे लागणार आहेत . (Pune Surat Flight News)

प्रस्थान-परतीच्या वेळा

प्रस्थान (पीएनक्यू ते एसटीव्ही) - प्रस्थान - १२:५५ वाजता, आगमन - १४:०० वाजता

परतीचा प्रवास (एसटीव्ही ते पीएनक्यू) - प्रस्थान - १२:५५ वाजता, आगमन - १४:०० वाजता

नव्या टर्मिनलचे १० मार्चला उद्घाटन

गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लाभला आहे. येत्या १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ४ ते ६ आठवडे सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतर नव्या टर्मिनलवरून उड्डाण सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी एकाच वेळी ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली, लखनऊ या विमानतळांवरील नवीन टर्मिनल आणि अलिगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती या विमानतळांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच, वाराणसी, कडप्पा, हुबळी आणि बेळगाव या विमानतळांच्या नवीन टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत. हे प्रकल्प एकूण १२ हजार ७०० कोटी रुपयांचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १० मार्चला दुपारी १२ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest