पुणे शहरास मिळणार दोन नवीन वंदे भारत गाड्या

पुणे: शहरातून पुणे-बडोदा आणि पुणे–सिकंदराबाद या नव्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जाणार आहेत. या नव्या रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे-बडोदा आणि पुणे–सिकंदराबाद या गाड्या मंगळवारपासून धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

पुणे: शहरातून पुणे-बडोदा (Pune Baroda) आणि पुणे–सिकंदराबाद(Pune – Secunderabad)या नव्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जाणार आहेत. या नव्या रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. 

येत्या १२ मार्च रोजी पुण्यासह देशाला नव्या १० वंदे भारत रेल्वे एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यात पुणे-बडोदा आणि पुणे–सिकंदराबाद या गाड्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून त्या सुरु करणार आहेत. (Vande Bharat Train Pune)

देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून सुरू आहेत. मुंबई-गांधीनगरदरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरून शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत.

आता देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होत आहेत. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून सुरू होणार आहेत. येत्या १२ मार्च रोजी राज्याला या दोन नव्या गाड्या पुण्याला मिळणार आहेत.

आणखी दोन गाड्या मिळण्याची शक्यता

देशभरातील धार्मिक स्थळांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जात आहे. अयोध्या रेल्वे स्थानकावर देशातून अनेक ठिकाणांवरून वंदे भारत एक्स्प्रेस येत आहेत. महाराष्ट्रात शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहेत. आता पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन वंदे भारत सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे संत गजानन महाराजांचे दर्शन घेणे मुंबई, पुण्यातील भाविकांना सोपे होणार आहे.

स्लीपर वंदे भारत येणार

अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनच्या चेअर कार व्हर्जनच्या यशानंतर आता लवकरच लोकांना वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन देखील रुळांवर पाहायला मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी वंदे भारत स्लीपर ट्रान्झिटच्या कार बॉडी स्ट्रक्चरचे उद्घाटन केले आहे.

बेंगळुरूमध्ये ऑक्टोबर २०२३ पासून वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर प्रोटोटाइप तयार होत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये राजधानी एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा चांगल्या सुविधा असणार आहेत . एकूण १०  वंदे भारत स्लीपर ट्रेनचा सेट तयार करण्याचे काम सुरू आहे.

पुणेकरांना तीन वंदेभारतचा लाभ

राज्यात बिलासपूर-नागपूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर, मुंबई-गोवा या ‘वंदे भारत’ सुरू असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ सुरू करावी, अशी मागणी रेल्वे समितीच्या बैठकीत खासदारांनी केली होती; तसेच सध्या पुण्यातून मुंबई-सोलापूर ही एक ‘वंदे भारत’ धावते, तर नव्याने पुणे-बडोदा ही गाडी सुरू होणार आहे. मुंबई-कोल्हापूर ‘वंदे भारत’ हीदेखील पुण्यातून धावणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना आता तीन ‘वंदे भारत’मधून प्रवास करता येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest