पुणे म्हणते आहे, ‘जरा देख के चलो’!
‘सीविक मिरर’ आणि ‘ पुणे टाइम्स मिरर‘ ने पुणे शहर पोलिसांच्या मदतीने सुरू केलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमाला आता महिना होऊन गेला असून वाहतूक स्थितीत बदल घडवून आणण्याचा पुण्याने निर्धार केला आहे. त्यामुळे पुढे सरसावत रस्त्याचे राजे बनलेल्या पुणेकरांनी हा प्रश्न आता आपल्या हाती घेतला आहे. स्वयंसेवक ‘मिरर’ टीमने तयार केलेले रॅप गीत गुणगुणत रस्त्यावर उतरत आहेत. सारे पुणे म्हणत आहे ‘जरा देख के चलो’.
वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या शहरातील ३० वर्दळीच्या चौकात रस्त्याचे राजे असलेले स्वयंसेवक वाहतुकीचे नियंत्रण करत आहेत. तसेच ते पोलिसांच्या कामातही मदत करत आहेत. वाहतुकीबाबत पुण्याला प्रशिक्षित करण्याचे स्वयंसेवकांनी मनोमन पक्के केले आहे.
‘जरा देख के चलो’ प्रेझेटेंड बाय ग्रॅव्हीट्टस फाऊंडेशन, को-पॉवर्ड बाय द मिल्स पुणे ॲण्ड सेलेबिलिटी, इन असोसिएशन विथ न्याती ग्रुप. द कॅम्पेन इज सपोर्टेड बाय लोकमान्य सहकारी सोसायटी आणि शिवतारा प्रॉपर्टीज. नॉलेज पार्टनर आहेत कुश चतुर्वेदी