पुणे : पंतप्रधान मोदींच्या सभा रेसकोर्सवर !, संभाव्य गर्दी विचारात घेऊन मैदान बदलले

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २९ एप्रिल रोजी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जाहीर सभा एसपी कॉलेज मैदानात होणार नसून रेसकोर्सवर होणार आहे.

Narendra Modi

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील एसपी कॉलेज ऐवजी रेसकोर्सवर सभा

 

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या २९ एप्रिल रोजी नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जाहीर सभा एसपी कॉलेज मैदानात होणार नसून रेसकोर्सवर होणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज सायंकाळी आयोजकांसमवेत रेसकोर्सची  पाहणी केली.

भाजपाच्या विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी संयुक्त सभा होणार आहे. त्यासाठी लाखो लोक येण्याची शक्यता आहे. एसपी कॉलेज मैदान बुक करण्यात आले होते. परंतु संभाव्य गर्दी, वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी रेसकोर्स मैदान निश्चित करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest