Diwali 2023 : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पालावरची दिवाळी

भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने राजगड पायथ्यापाशी असलेल्या पाल बुद्रुक या अतिदुर्गम गावात कातकरी समाजच्या बांधवाबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात कातकरी वस्ती वरील रहिवाशी यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली

Diwali 2023 : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पालावरची दिवाळी

भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने पालावरची दिवाळी

पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने राजगड पायथ्यापाशी असलेल्या पाल बुद्रुक या अतिदुर्गम गावात कातकरी समाजच्या बांधवाबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात कातकरी वस्ती वरील रहिवाशी यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी वस्तीवरील लहान मुलांना नवीन कपडे, फटाके, मिठाई चे वाटप महिलांना साडी चोळी, भांडी कुंडी तसेच महिना भर पुरेल एवढा शिधा देण्यात आला.

यावेळी बोलताना घाटे म्हणाले की, 'दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे आपण शहरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करत असतो परंतु हा उत्सव समाजातील वंचित घटकाबरोबर साजरा करण्यात जो मनस्वी आनंद प्राप्त होतो तो अद्वितीय असतो.'

यावेळी कातकरी समाजच्या वतीने ही शहर भा ज पा चे आभार मानण्यात आले. या उपक्रमात शहराध्यक्ष घाटे यांच्या सह सरचिटणीस पुनीत जोशी, बापू मानकर ,राजेंद्र शिळीमकर, रवींद्र साळेगावकर, महेश पुंडे, राहुल भंडारे,वर्षा तपकीर, सुभाष जंगले महिला आघाडी अध्यक्षा हर्षदा फरांदे,री ,युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ,ओ बी सी आघाडी नामदेव माळवदे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest