संग्रहित
पुण्यातील बंगळुरु महामार्गावर वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई बंगळुरु मार्गावरील भूमकर चौक मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
पुणे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, गंभीर अपाघातांच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते 11 आणि सांकाळी 5 ते 9 या वेळेत भूमकर चौक ते कंट्रोल चौकादरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.
नऱ्हे, धायरी परिसराचा पुणे महापालिकेत समावेश झालाय. या भागांमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तसेच खासगी काही कंपन्यादेखील आहेत. भागातील वाहतूक, वाढती लोकसंख्या तसेच, अपघातांचे वाढते प्रमाण विचारत घेऊन भूमकर चौकातील भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील कंट्रोल चौकदरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलिस उपायुक्त झेंडे यांनी दिले आहेत.
तसेच, रस्त्यावरील मॅकडोनाल्डस भागातील दोन्ही बाजूस 50 मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकराची वाहने लावण्यास मनाई करण्यात आलीय. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालय, येरवडा, गोल्फ क्लब रस्ता येथे लेखी स्वरुपात कळवाव्यात असे आवाहनदेखील उपायुक्तांनी केले आहे.
शिस्त पाळा नाहीतर पाच एक हजार भरा दंड
अजित पवार यांनीदेखील पुणे वाहतुकीवर भाष्य केलं आहे. लोकांनी वाहतूक शिस्त पाळले पाहिजे. शिस्त न पाळल्यास पाच एक हजार रुपये दंड करण्याचा विचार आणि त्यावर प्राथमिक चर्चा सुरु असल्याचे पावर म्हणाले.