मेट्रो, उड्डाणपुलाने केली पुणेकरांची बत्ती गुल
पुणे : गणेशखिंड, शिवाजीनगर परिसरात मेट्रो (Pune Metro) व उड्डाणपुलासाठी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरु आहे. जेसीबीद्वारे सुरु असलेल्या या खोदकामात गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल ३६ ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. यामध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, (Narayan Peth) शिवाजीनगर, गणेशखिंड परिसरातील (JCB) सुमारे १९ हजार वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा (Mahavitran) नाहक मनस्ताप सहन (Pune News) करावा लागत आहे. तर महावितरणला आतापर्यंत वीजविक्रीमध्ये सुमारे १७ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले असून वीजग्राहकांचा रोष देखील सहन करावा लागत आहे.
संचेती हॉस्पिटल ते विद्यापीठ रस्त्याबाजूच्या भूमिगत वीजवाहिन्यांमधून सदाशिव पेठ, नारायण पेठ, लक्ष्मीरोड, मॉडेल कॉलनी, रेंज हिल्स रोड, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, अशोकनगर, साखर संकुल, वाकडेवाडी, एफसी रोड, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसर, सिमला ऑफीस, हर्डीकर हॉस्पिटल, आकाशवाणी, कासारवाडी या परिसरातील सुमारे १९ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मात्र गेल्या २० दिवसांमध्ये रस्ता रूंदीकरणाच्या खोदकामामध्ये तब्बल ३६ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व परिसरातील ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजवाहिन्या तोडण्याचा सपाटा दररोज सुरु आहे. एकाच दिवशी तब्बल ६ ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याचे प्रकार घडले आहेत.
रस्ता रूंदीकरणासाठी भूमिगत वीजवाहिन्या स्थानांतरीत करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांवरच रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे. खोदकामात वारंवार क्षतीग्रस्त झालेल्या व जोड दिलेल्या वीजवाहिन्या भविष्यात नादुरुस्त झाल्यास वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या रस्त्याखाली दबलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती सततच्या वाहतुकीमुळे अतिशय अवघड होईल आणि पर्यायी स्वरुपाचा वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देताना मोठ्या कालावधीसाठी वीज खंडीत राहू शकेल, अशी स्थिती आहे. यामुळे वीजग्राहकांसोबतच महावितरणला देखील मोठा फटका बसणार आहे.
रस्ता रूंदीकरणामध्ये जमिनीवरील वीजयंत्रणेमधील केवळ फिडर पिलर स्थानांतरीत करण्यात येत आहे. मात्र भूमिगत वाहिन्या जैसे थे ठेवून रस्ता तयार करण्याचे काम सुरु आहे. खोदकामात वारंवार तोडलेल्या वाहिन्यांना तात्पुरता जोड देऊन तसेच क्षतीग्रस्त करून रस्त्याखाली दाबल्या जात आहे. रस्त्याखाली दाबलेल्या या कमकुवत वीजवाहिन्यांमुळे गणेशखिंड, शिवाजीनगर, सदाशिवपेठ, नारायण पेठ, लक्ष्मी रोड या परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याचा धोका आहे. खोदकामात तोडलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच पर्यायी वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना रात्री बेरात्री धावपळ करावी लागत आहे. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध न झाल्यास काही ठिकाणी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित राहत आहे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.