महापारेषणचे खराडी उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

पुणे: महापारेषण कंपनीचे खराडी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र अत्यावश्यक पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. २३) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने नगर रोड परिसरातील वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

पुणे: महापारेषण कंपनीचे खराडी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र अत्यावश्यक पूर्वनियोजित देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. २३) सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने नगर रोड परिसरातील वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

महापारेषणच्या खराडी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या २२ केव्हीच्या पाच वीजवाहिन्यांद्वारे खुळेवाडी, विमाननगर परिसर, सोपाननगर, कोलते पाटील फेज ते , येरवडाशास्त्रीनगर, लक्ष्मीनगर, संजय पार्क, आळंदी रस्ता, संभाजीनगर, न्याती, लोहगाव, वडगाव शिंदे, वडगाव गावठाण, पाटीलमळा, खांदवेनगर, खराडी बायपास, वडगाव शेरी परिसर, धानोरी परिसर, श्री पार्क सोसायटी, श्रीराम सोसायटी, खुळेवाडी गाव, गिगा स्पेस बिल्डिंग आदी परिसराला वीजपुरवठा केला जातो. मात्र महापारेषणच्या उपकेंद्रातील काही यंत्रणेची दुरुस्ती सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिशय आवश्यक झाली आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २३) सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत महावितरण महापारेषणकडून ३४ मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी स्वरुपात सर्व पाचही वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक नियोजन पूर्ण झाले आहे. मात्र ऐनवेळी पाचपैकी एखाद्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित वाहिनीवरील भागात वीज खंडित होऊ शकते. त्यासंबंधीची माहिती संबंधित वीजग्राहकांना एसएमएसद्वारे ताबडतोब दिली जाणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण महापारेषणने केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest