संग्रहित छायाचित्र
पुणे शहरातील (Pune city) कुत्र्यांची (Dog) संख्या कमी झाल्याचा दावा महापािलका करीत असली तरी कुत्रा चावण्याच्या घटनेत घट झालेली दिसुन येत नाही. गेल्या नऊ महीन्यात साेळा हजाराहून अधिक जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. दरम्यान, कुत्र्यांना रैबीजची लस देण्यासाठी माेहीम (PMC) राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेने २०18 मध्ये कुत्र्यांची गणना केली हाेती. यामध्ये शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या ही ३ लाख १५ हजार इतकी आढळून आली हाेती. त्यानंतर मे 2023 मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना केली होती. यामध्ये शहरात १ लाख ७९ हजार ९४० कुत्री असल्याचे आढळून आहे हाेते. कुत्र्यांच्या संख्येत सुमारे ४२. ८७ टक्के घट झाल्याचा दावा महापािलका प्रशासनाकडून केला जात आहे. त्याचवेळी कुत्रा चावण्याच्या घटनांत अद्याप घट झाली नाही.
गेल्या नऊ महिन्यांत भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 16 हजार 372 घटना घडल्या आहेत. तर गेल्यावर्षी भटक्या कुत्र्यांनी 16 हजार 569 जणांना चावे घेतले होते. या दोन्ही आकडेवारीचा विचार करता पहील्या नऊ महीन्यात यावर्षी गेल्यावर्षी एवढ्या घटना घडल्या असून, यात पुढील तीन महीन्याच्या आकडेवारीची भर पडली तर वाढ हाेऊ शकते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.