आरोग्य केंद्र ओतूरच्या वतीने बुधवारी इयत्ता १० तील मुलांची, मुलींची आरोग्य तपासणी
ग्राम विकास मंडळ ओतूर संचालित चैतन्य विद्यालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरच्या वतीने बुधवारी इयत्ता १० तील मुलांची, मुलींची आरोग्य तपासणी, लसीकरण केल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा, या उपक्रमांतर्गत विद्यालयातील १० वी च्या २५० विद्यार्थ्यांची ओतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी, लसीकरण करण्यात आले.
यात विद्यार्थ्यांचा आहार व विहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य तपासणीत कान,नाक,घसा,डोळे,त्वचेचे आजार,पोटाचे आजार, विद्यार्थ्याचे वजन व उंचीची तपासणी करून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी सारोक्ते, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती ढोक,डॉ.प्रमिला पलगडमल,आरोग्य सेवक सुनील यादव,आरोग्य साहाय्यक सविता पगार, परिचारिका प्रमिला पवार यांचे सहकार्य मिळाले.
तपासणी वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर,उपमुख्याध्यापक संजय हिरे,पर्यवेक्षक अनिल उकिरडे,शिक्षक प्रतिनिधी संतोष सोनवणे, विशाल चौधरी आदी उपस्थित होते.