संग्रहित छायाचित्र
पुणे : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सावाला मोठ्या दिखामात सुरवात झाली आहे. शहरातील मंडळांचे देखावे आणि मानाचे गणपती चे दर्शन घेण्यासाठी शहरासह देशभरातून गणेश भक्तांचा ओढा वाढला आहे. शेवटच्या पाच दिवसांमध्ये लाखोंच्या संख्येने भक्त येतात. या गर्दीत महिलांची कुंचबना होणार नाही, याची महापालिकेने काळजी घेतले असून ठिकठिकाणी फिरते शौचालयांची व्यवस्था केली आहे. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील सुलभ शौचालये मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सीविक मिररला सांगितले.
महापालिकेकडून पालखी सोहळा, गणेशोत्सवात तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाते. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियोजन केले जाते. पालखी सोहळ्यामध्ये लाखो संख्येने वारकरी येत असतात. त्यांची योग्य प्रकारे काळजी महापालिकेककडून घेतली जाते. तसेच मेडिकल कॅम्प लावले जातात. त्याच धर्तीवर आता गणेशोत्सवात महापालिकेने नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत दररोज दोनशे फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पाचव्या दिवसानंतर एक हजाराने ते वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तसेच ही शौचालये स्वच्छ ठेवण्याची देखील काळजी घेण्यात आली असून त्यासाठी सेवक तैनात करण्यात आले आहेत.
सुलभ शौचालयांसह खासगी हॉटेल चालकांना देखील त्यांची स्वच्छतागृहे ही नागरिकांसाठी खुली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थांची खरेदी करावीच अशी सक्ती त्यांना करता येणार नाही. नागरिकांची संख्या बघता इतरांनीदेखील सहाकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
श्री गणेश विसर्जनाकरिता पुणे महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी...
पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता सर्व स्तरांवरुन जय्यत तयारी करण्यात आलेली असून याकरिता पालिकेचे विविध विभाग, क्षेत्रिय कार्यालयांनी आपल्या स्तरावरही जय्यत तयारी केलेली आहे.
नदीकिनार परिसरातील विसर्जन घाटांवरील दुरुस्ती, रंगरंगोटी, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, विसर्जन घाटावरील विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्थेचे नियोजन या स्वरुपाच्या कामाबरोबरच सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरातून
विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, दोन पाळ्यांतून अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळती ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे
करणेकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आलेली आहे. सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे.
गणेश विसर्जन कोणत्याही नदी किवा तलावात (नैसर्गिक जलस्त्रोतात)करू नये. जमा झालेले निर्माल्य कोठेही न टाकता महानगरपालिकेच्या यंत्रणेकडे सुपूर्त करावे किवा निर्माल्य कलशामध्ये टाकावे. तसेच दैनंदिन येणाऱ्या कचरा वेचकांमार्फत सुद्धा घरातील निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश मूर्ती विसर्जनाऐवजी मूर्तीदान हि संकल्पना महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी मूर्ती दान करावी.
दीड दिवसांचे गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेने पार पडले. १५ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बांधलेल्या हौदात २७२२ मूर्तींचे विसर्जन झाले, लोखंडी टाक्यांमध्ये ७६२७ मूर्तींचे विसर्जन झाले, संकलित केलेल्या १०९७ मूर्ती होत्या. अशा रीतीने एकूण ११४४६
गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच अंदाजे १३३७५.७५ किलो निर्माल्य जमा झाले. अशी माहिती प्रशासनाने दिली.