पुणे : हरका नगर येथे मुलांच्या वसतिगृहात आग

आज दिनांक २४ रोजी दुपारी साडेचार वाजता भवानी पेठ, हरका नगर येथे गोल्डन ज्युब्ली टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे मुलांच्या वसतिगृहात आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आले होते.

Pune Fire

पुणे : हरका नगर येथे मुलांच्या वसतिगृहात आग

पुणे : आज दिनांक २४  रोजी दुपारी साडेचार वाजता भवानी पेठ, हरका नगर येथे गोल्डन ज्युब्ली टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे मुलांच्या वसतिगृहात आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाच्या मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आले होते. (Pune Fire)

घटनास्थळी जवान पोहोचताच पाहिले असता, इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये असणाऱ्या वसतिगृहात दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ०४ मध्ये आग लागली होती. जवानांनी तातडीने श्वसनाचे उपकरण (बी ए सेट)  आगग्रस्त खोलीमध्ये कोणी विद्यार्थी अडकले नसल्याची खाञी करत आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवत पुढील धोका दुर केला. आगीमध्ये कोणीही जखमी नसून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीमध्ये गाद्या,बेंच,  पंखे व इतर जीवनावश्यक वस्तु जळाल्याने नुकसान झाले. 

या कामगिरीत अग्निशमन दलाचे वाहनचालक अतुल मोहिते, दत्तात्रय वाघ व तांडेल मंगेश मिळवणे आणि जवान आझीम शेख, सागर ठोंबरे, अजय कोकणे, किशोर कारभाळ, मयुर ढुबे, संकेत सरडे, सागर शिर्के यांनी सहभाग घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest