PMPML Bus : 'प्रवाशां'नो रस्त्यात नको, बस थांब्यावरच थांबा

पीएमपी बस येण्यास वेळ आहे, बसची वाट पाहण्यासाठी बस थांब्यात बसलो आहे, बस येते थांबते, प्रवाशी थांब्यातून उठतो, बसमध्ये बसतो मग बस पुढच्या मार्गाने जाते. असे चित्र केवळ आपण चित्रपटात पाहतो. प्रत्यक्षात मात्र रस्त्यावरच उभे राहिले तरच बस थांबते अन् एक पाऊल ठेवताच बस पुढे जाते.

PMPML Bus : 'प्रवाशां'नो रस्त्यात नको, बस थांब्यावरच थांबा

'प्रवाशां'नो रस्त्यात नको, बस थांब्यावरच थांबा

बस मित्रांकडून पीएमपी बस चालकांना बस थांब्यावर थांबवण्याची विनंती

पुणे : पीएमपी बस येण्यास वेळ आहे, बसची वाट पाहण्यासाठी बस थांब्यात बसलो आहे, बस येते थांबते, प्रवाशी थांब्यातून उठतो, बसमध्ये बसतो मग बस पुढच्या मार्गाने जाते. असे चित्र केवळ आपण चित्रपटात पाहतो. प्रत्यक्षात मात्र रस्त्यावरच उभे राहिले तरच बस थांबते अन् एक पाऊल ठेवताच बस पुढे जाते. त्यामुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांचा जीव महत्वाचा तसेच चालकांना देखील शिस्त लागावी यासाठी बस मित्रांकडून 'प्रवाशांनो रस्त्यात नको, बस थांब्यावरच थांबा' असे आवाहन करुन चालकांना बस थांब्यावर थांबविण्याची विनंती केली जात आहे.

पीएमपीच्या चालकांची आणि प्रवाशांची मानसिकता बदलण्यासाठी आम आदमी पार्टीचे (आप) चेंथिल अय्यर यांच्या संकल्पनेतून 'बस मित्र' ही संकल्पना राबविली जात आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी तसेच पीएमपी चालक, प्रवाशांना एक प्रकारे चांगली शिस्त लावण्याचे आवाहन केले जात आहे. ही संकल्पना बघून प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असून स्वयंमसेवकांची देखील संख्या वाढू लागली आहे.

रस्त्यावरील बस थांब्यांबर प्रवासी थांबले तरी बस मात्र रस्त्याच्या बाजूला उभी केली जाते. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावरून रस्त्यावरील बसमध्ये चढण्यासाठी धावपळ करावी लागते. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले तसेच हातामध्ये बॅग असलेल्या प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. त्यात चालकांकडून प्रवासी बसमध्ये चढताच क्षणी बस पुढे हलविले जाते. त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. तसेच बस आणि बस थांबा यामध्ये अंतर पडते. त्यावेळी उलट्या दिशेने येणारी वाहने आणि रिक्षा चालक थांबत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बस मित्रचे स्वयंसेवक प्रवाशांना बस थांब्यावर थांबण्याचे आवाहन करतात. तसेच एक स्वयंमसेवक बसला हात करुन थांब्याजवळ बस थांबण्याची विनंती करतात. त्यामुळे मधले अंतर कमी होते. तसेच प्रवाशांना देखील सोयीचे ठरते. यामुळे सुरक्षितता वाढली आहे. तसेच चालकांनी देखील आता बस रस्त्याच्या मध्ये थांबण्याचे बंद केले आहे. असा अनुभव अय्यर सीविक मिररला सांगितले.

 

बस मित्र काय करतात...

- नागरिक सहभाग घेऊन पीएमपी बसची तपासणी करतात

- नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन

- प्रवाशांच्या अडचणी समजून घेतात

- बस चालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करतात 

- प्रवाशांना बसशेडच्या आत उभे राहण्याची विनंती

- बसमध्ये यूपीआय प्रणाली वापरून तिकीट दिले जात आहे का ?

-  रिक्षा व इतर खासगी वाहने बस थांबाच्या दोन्ही बाजूला 10 मीटरच्या आत उभी न करण्याची विनंती

- बस चालकांना बस स्टॉपजवळ थांबण्याच्या विनंती

- फर्स्ट एड किट, फायर इक्विपमेंट व्यवस्थित आहेत का ?

 

पु्ण्यात असेच चालते...तुम्ही नवीन आहात काय ?

पीएमपी बसची वाट पाहत थांबलो होतो. थांब्यावर येत असताना त्याच दरम्यान उलट्या दिशेन दुचाकी जात होता. त्यामुळे मला बसमध्ये जाता आले नाही. दुचाकी चालकाला जाब विचारला असता, तुम्ही पुण्यात नवीन आहात काय. बसमध्ये चढण्यासाठी रस्त्यावर उभे राहवे लागते. एक जागी बसला तर बस काय तुमच्यासाठी थांबणार नाही. तसेच बस आणि थांब्यामध्ये एवढी मोकळी जागा असताना वाहने येथून जाणारच असे त्याने उत्तर दिले. तसेच प्रवासी देखील बस थांब्यावर न थांबता रस्त्यावरच उभे राहत होते. अनेकांना विचारणा केली असता, बस रस्त्यातच उभी राहते त्यामुळे प्रवासी देखील रस्त्यावर उभे राहतात. असे सांगितले. ही मानसिकता बदलली पाहिजे. बस ही थांब्याजवळ उभी राहिली, असा साधा नियम आहे. तो अंमलात येयला हवा, या ध्येयाने काम करण्यास सुरवात केली. त्यातून बस मित्र ही संकल्पना सत्यात उतरली असे अय्यर यांनी सांगितले. त्यांच्या सोबत  माधुरी गायकवाड, फेबियन अण्णा सॅमसन, मानुरे आणि मोईन पठाण, मिलिंद ओव्हाळ, कुणाल धनवडे यांच्यासह ५० ते ६० स्वयंमसेवक बस मित्र म्हणून सेवा करत आहेत.

दर बुधवारी 'बस मित्र' करतात सेवा...

दर बुधवारी बस मित्र संध्याकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेत सेवा करतात. शहरातील सध्या १० ते १५ ठिकाणांवरील बस थांब्यावर थांबता. त्यावेळी प्रवाशांना बस थांब्यावर थांबण्याचे आवाहन करतात. ही सेवा गेल्या एक महिना भरापासून सुरु आहेत. संकल्पना चांगली असल्याने प्रवाशांसह चालकांकडून देखील याला साथ मिळत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रवाशांची चालकांचा मानसिकता बदलण्यासाठी प्रवाशांनी बस मित्र म्हणून एकत्र यावे, असे आवाहन अय्यर यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest