प्रदुषणमुक्त आणि फटाकेविरहित दिवाळी साजरी करा, महापालिकेचे आवाहन
पुणे : शहरातील नागरिकांनी दिवाळी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावे, असे महापालिकेने नागरीकांना आवाहन केले आहे. दिवाळी हा सण अंधार करुन दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. हा सण साजरा करताना नागरिकांनी हवा प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषण यांसारख्या उदभवणाऱ्या समस्यांना आळा घालण्याकरिता पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा.
हवा प्रदुषण : फटाके हे वायू प्रदुषणास कारणीभूत ठरतात तरी शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी फटाक्यांचा वापर करणे टाळावे.
पर्यावरण विभाग पुणे महानगरपालिका हवा प्रदूषणाचे प्रमाण जास्त झाल्याने श्वसनाचे आजार होवू शकतात यासाठी जास्त धूर उत्सर्जित करणाच्या फटाक्यांचा वापर करणे टाळावे.
ध्वनीप्रदुषण : मोठ्या आवाजाचे फटाके ध्वनी प्रदुषण करतात, अशा फटाक्यांचा वापर करू नये, दिवाळीत 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके उडविण्यास मनाई केली आहे तरी यांसारखे फटाके उडविणे टाळावे. नागरिकांनी शांतता क्षेत्र जसे की शैक्षणिक संस्था दवाखाने न्यायालये आदी. ठिकाणी फटाके उडवू नये
पर्यावरणपूरक पर्याय : नागरिकांनी घर मजविण्यासाठी अधिक ऊर्जा कार्यक्षम प्रकाश देणारे LED दिवे किंवा अपारंपारिक ऊर्जा स्रोत जसे की सौर दिवे वापरावेत. रेडिमेड ( पासून बनवलेले किल्ले पर्यावरणास घातक ठरतात त्यांचा वापर न करता दगड मातीपासून किल्ले बनवावेत.
रासायनिक रंग / रांगोळी न वापरता नैसर्गिक सहित्यांसह रांगोळी आकर्षक बनवावी. तसेच प्लास्टिकचे आकाशकंदील न वापरता पर्यावरणपूरक किंवा रिमायकल करता येणाया वस्तूंपासून बनलेले आकाशकंदील वापरून इको फ्रेंडली सजावट करावी. असे आवाहन पालिकेने केले आहे.