बाप्पांची मुर्ती घराबाहेर बसविली, २० वर्षानंतर पुणेकर दाम्पत्याला लाखांचा दंड

पुणे शहराचा गणेशोत्सव हे जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात. असे असले तरी पुण्यात घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून चक्क २० वर्षानंतर पुण्यातील वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहरचना सोसायटीमधील ज्येष्ठ दाम्पत्याला ५ लाख ६२ हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Mon, 17 Jul 2023
  • 12:15 pm
Punekar couple : बाप्पांची मुर्ती घराबाहेर बसविली, २० वर्षानंतर पुणेकर दाम्पत्याला लाखांचा दंड

बाप्पांची मुर्ती घराबाहेर बसविली, २० वर्षानंतर पुणेकर दाम्पत्याला लाखांचा दंड

सोसायटीचा नियम बदलल्याने दाम्पत्याला लाखांचा दंड

पुणे शहराचा गणेशोत्सव हे जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात. असे असले तरी पुण्यात घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून चक्क २० वर्षानंतर पुण्यातील वानवडी येथील फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहरचना सोसायटीमधील ज्येष्ठ दाम्पत्याला ५ लाख ६२ हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.

पुण्यातील वानवडी येथे फ्लॉवर व्हॅली सहकारी गृहहरचना सोसायटी असून या सोसायटीत सुमारे २७९ हून अधिक फ्लॅटधारक आहे. संध्या होनावर (वय ६५) व त्यांचे पति सतिश होनावर (वय ७२) या दोन्ही ज्येष्ठ दांपत्याने २००२ साली येथे सातव्या मजल्यावर घर खरेदी केले. घर खरेदी केल्यावर त्यांनी वास्तूशांती केली आणि पुजारी यांनी या दोन्ही दाम्पत्याला घराच्या बाहेर मूर्ती बसवायला सांगितली. तेव्हा दाम्पत्याने २००२ साली घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली.

पुढे २००५ साली सोसायटी रजिस्टर करण्यात आली. मात्र, मुर्ती घराबाहेर बसविल्यामुळे तब्बल २० वर्षानंतर सोसायटीकडून ५ लाख ६२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आत्ता हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचले आहे. याबाबत संध्या होनावर म्हणाल्या की, आम्ही जेव्हा घर घेतले तेव्हा आम्ही वास्तू शांती केली आणि आम्ही आमचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती घराबाहेर बसविली. तीही (पापीयर मासी) कागदापासून बनविलेली गणपती बाप्पांची मुर्ती जवळपास ३ ते साडेतीन फुटांची आहे. आम्ही मुर्ती घराच्या बाहेर कोपऱ्यात बसविली. तिची नितीनियमाने पुजा करत असतो. तसेच आजूबाजूला राहणारे लोक देखील येता जाता बाप्पाचे दर्शन घेतात.

माझे पती सतिश होनावर हे सन २००२ पासून याच सोसायटीचे सदस्य असून २०१६ ते १८ या कालावधीमध्ये ते सोसायटीचे चेअरमन होते. माञ त्यांच्या आजारपणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर २०१९ ला सोसायटीवर नवीन बाँडी आली आणि नवे नियम आले. नवीन आलेल्या बॉडीने, सदनिकेच्या बाहेर सोसायटीची जागा असून त्याठिकाणी सदनिकेच्या बाहेर असणाऱ्या लाँबीमध्ये (मोकळ्या) जागेत चप्पल स्टँड कोणी ठेवायचे नाही. तसेच झाडांच्या कुंड्या किंवा अडगळीचे सामान ठेवायचे नाही, असा निर्णय घेतला. ठेवल्यास शासनाच्या नियमानुसार महिण्याच्या टँक्सच्या पाच पट रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल. अशी तंबी देखील त्यांनी दिली, अशी माहिती संध्या होनावर यांनी दिली.

नव्या नियमानंतर होनावर यांना २०१९ मध्ये सोसायटीने नोटीस पाठवली. यात तुम्ही देखील घराबाहेर बसविलेली गणपती बाप्पाची मूर्ती काढून टाका, असे सांगाण्यात आले. पण होनावर यांनी ती मूर्ती काढली नाही. त्यामुळे दाम्पत्याला आता सोसायटीने गणपतीची मुर्ती बाहेर ठेवली म्हणून ५ लाख ६२ हजार रुपये दंड लावण्यात आला आहे. याबाबत पुढे माहिती देताना संध्या होनावर म्हणाल्या की, “जेव्हा नोटीस दिली तेव्हापासून आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. आम्ही जे केले आहे ते चुकीचे नसून आम्ही घर घेतल्यापासून मूर्ती बसविली आहे. आत्ता हे लोक आमच्यावर दबाव आणत आहेत. हे असे का करत आहे? ते माहीत नाही. पण जीव गेला तरी चालेल पण बाप्पांची मुर्ती ठेवल्या ठिकाणावरुन हलविणार नाही.

याबाबत फ्लॉवर व्हॅली सोसायटीचे सेक्रेटरी कल्याण रामायण म्हणाले की, आम्ही जो निर्णय घेतला आहे तो गणेश मूर्तीच्या विरोधात नाही. आमच्या कमिटीने २०१९ साली इन्करोजमेंटच्या विरोधात ॲक्शन घेतली. सोसायटीतील ११८ जणांनी इन्करोजमेंट केले होते. यात कोणी फिश टॅंक लावले होते तर कोणी बाहेर जागेवर काम केले होते. जेव्हा आम्ही सोसायटीची जनरल मीटिंग घेतली तेव्हा ७९ मेंबर्सनी या सर्वांच्या विरोधात ॲक्शन घ्या अस सांगितले. नाहीतर आम्हाला देखील परवानगी द्या अ सांगितले. तेव्हा आम्ही या सर्वांच्या विरोधात ॲक्शन घेतली. यात ११८ पैकी ११० लोकांनी त्यांच्या घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या अनधिकृत गोष्टी काढून टाकल्या आहेत. फक्त हे दाम्पत्य धार्मिक बाजू पुढे करून विरोध करत आहे. आमची देखील बाप्पावर श्रद्धा असून त्यांना जर श्रद्धा आहे तर त्यांनी बाप्पाची मूर्ती ही घरात बसवावी. आमचे काहीही म्हणणे नाही. आम्ही हे मानतो की आधीच्या लोकांनी कारवाई करायला पाहिजे होती. पण ती झाली नाही. पण आता आम्ही जे काही त्यांना नोटीस तसेच दंड आकाराला आहे. ते कायदेशीर मार्गाने आकाराला आहे. ही बाजू देखील आम्ही न्यायालयात मांडत आहोत, असे कल्याण रामायण यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest