विकास टिंगरे
पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्या कार्यालयात आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकास शिवाजी टिंगरे (वय ४९) असे या काँग्रेस पदाधिकाऱ्याचे नाव आहे. धानोरी परिसारातील पोरवाल रोड येथील पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांचा मृतदेह मंगळवारी (दि. २३) सायंकाळच्या सुमारास आढळून आला आहे.
या घटनेची माहिती मिळाताच विश्रांतवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. विकास टिंगरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलीसांना आहे. विकास टिंगरे हे विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मृतावस्थेत दिसताचा कार्यकर्त्यांनी विकास टिंगरे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
विश्रांतवाडी पोलीसांनी विकास टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, आत्महत्या केल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.