पुणे जिल्हा परिषदेतील भरतीसाठी आलेल्या अर्जातून ६ कोटी ६६ लाख महसूल प्राप्त

एक हजार पदांसाठी ७४ हजार ५०७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या ऑनलाइन अर्जातून जिल्हा परिषदेला यातून ६ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Fri, 1 Sep 2023
  • 07:05 pm
Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेतील भरतीसाठी आलेल्या अर्जातून ६ कोटी ६६ लाख महसूल प्राप्त

पुणे जिल्हा परिषदेतील भरतीसाठी आलेल्या अर्जातून ६ कोटी ६६ लाख महसूल प्राप्त

एक हजार पदांसाठी ७४ हजार ५०७ उमेदवारांनी केले अर्ज

पुणे जिल्हा परिषदेमध्ये १ हजार जागांसाठी नोकर भरती होणार आहे. या एक हजार पदांसाठी ७४ हजार ५०७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या ऑनलाइन अर्जातून जिल्हा परिषदेला यातून ६ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेत गट क सवंर्गातील २१ पदांच्या सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला यातून ६ कोटी ६६ लाख ५२ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest