स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी कसरत!, वारकऱ्यांसाठी १६८० स्वच्छतागृह पालिकेने केली उपलब्ध, सेवेसाठी ११ हजार कर्मचारी तैनात
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मंगळवारी रवाना होत आहे. हा सोहळा रविवारी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यनगरीत विसावला होता. सोहळ्यात सुमारे ८ लाखाहून अधिक वारकरी पुण्यात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सेवेसाठी पुणे महापालिकेने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. पालिकेने स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. मात्र ती स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पालिकेने दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारकऱ्यांसाठी सुमारे १६८० स्वच्छतागृह उपलब्ध करून दिली. मात्र ही स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग २४ तास यावर लक्ष ठेवून असून स्वच्छता राखण्याचे काम करत आहे. पुण्यात होणारी वाहतूक कोंडी तसेच वारकरी, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे व्यवस्थेवर ताण आला आहे. पालिकेचे सुमारे ११ हजार कर्मचारी, सेवक पालखी सोहळ्यात सेवेत आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत आहे.
पालिकेचे ११ हजार कर्मचारी विविध सेवेतून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. व्यवस्थेवर ताण येत असला तरी परिपूर्ण सेवा देण्यावर भर आहे. सर्व अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करत आहेत.
- संदीप कदम, घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रमुख.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.