पिंपरी-चिंचवड: महापालिकेतर्फे स्वच्छ सांस्कृतिक उत्सव; अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची उत्सवाला विशेष उपस्थिती

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा' पंधरवडा निमित्त स्वच्छ सांस्कृतिक उत्सव आयोजित करण्यात येणार असून ख्यातनाम सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 06:27 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

‘स्वच्छता ही सेवा' पंधरवडानिमित्त पर्यावरण जगजागृतीवर देणार भर

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या (PCMC) वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा'  पंधरवडा निमित्त स्वच्छ सांस्कृतिक उत्सव आयोजित करण्यात येणार असून ख्यातनाम सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी दिली आहे.

२ ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत शुक्रवारी (२० सप्टेंबर) रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत सी सर्कल, स्पाईन रोड, भोसरी येथे ‘स्वच्छ सांस्कृतिक उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास मराठी सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या उत्सवास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहे. यासोबतच विशेष अतिथी म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती असणार आहे.

तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यांसह शहरातील पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे. तरी आपले शहर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest