पिंपरी-चिंचवड: शहरात विसर्जन घाटांवरून २५० टन निर्माल्य संकलन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'बाप्पा'ला निरोप देत यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. या गणेशोत्सवात शहरातील विविध विसर्जन घाटांवरून २५० टन निर्माल्य संकलन झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागासह स्वयंसेवी संस्थांनीही निर्माल्य संकलनासाठी मदत केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Sep 2024
  • 06:22 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'बाप्पा'ला निरोप देत यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. या गणेशोत्सवात शहरातील विविध विसर्जन घाटांवरून २५० टन निर्माल्य संकलन झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागासह स्वयंसेवी संस्थांनीही निर्माल्य संकलनासाठी मदत केली.

पिंपरी-चिंचवड शहरात अनंत चतुर्दशीला सर्वत्र आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. महापालिकेने विसर्जन घाटावर दीड दिवसाच्या विसर्जनापासून निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. गणेश विसर्जन करताना मूर्तीबरोबर हार, फुले, प्रसादही पाण्यात टाकावे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मात्र, भाविकांच्या या श्रध्देपोटी मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीत टाकले जात असल्याने जलप्रदूषण होते. भाविकांना हे निर्माल्य विसर्जन घाटावर ठेवलेल्या निर्माल्य कुंडात टाकण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यता येत होते. विसर्जन घाटावर मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीही सहभागी होत पालिकेला सहकार्य केले. विसर्जन घाटांवर ठेवलेल्या निर्माल्य कुंडात मोठ्या प्रमाणात निर्माल्य संकलन झाले आहे. यावर्षी २५० टन निर्माल्य संकलन झाले आहे. त्यापैकी ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक ५५ टन निर्माल्य संकलन झाले असून सर्वात कमी १६ टन निर्माल्य ह प्रभागात संकलित झाले.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय निर्माल्य २४८

- अ क्षेत्रीय कार्यालय २४ टन
- ब क्षेत्रीय कार्यालय ५५ टन
- क क्षेत्रीय कार्यालय ३१ टन
- ड क्षेत्रीय कार्यालय ३२ टन
- ई क्षेत्रीय कार्यालय ३४ टन
- फ क्षेत्रीय कार्यालय २४ टन
- ग क्षेत्रीय कार्यालय ३२ टन
- ह क्षेत्रीय कार्यालय १६ टन
- एकूण २५० टन

गणेशोत्सव विसर्जनादरम्यान २५० टन निर्माल्य संकलन झाले आहे. यावर्षी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी प्रयत्न केले. या मोहिमेला नागरिक व स्वयंसेवी संस्थांची मदत मिळाली.
- अजिंक्य येळे, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest