दिव्यांगांच्या ई-वाहनांसाठी महापालिका देणार अर्थसाहाय्य

दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने योजना आखली आहे. त्यानुसार, दिव्यांगांना फिरत्या वाहनांवरील दुकान म्हणजे तीन चाकी ई-वाहन उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Edited By Admin
  • Fri, 5 Jul 2024
  • 04:14 pm
pimpri chinchwad news, Municipal Corporation,  three wheeler e-vehicles. disabled

संग्रहित छायाचित्र

दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे आवाहन

दिव्यांगांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने योजना आखली आहे. त्यानुसार, दिव्यांगांना फिरत्या वाहनांवरील दुकान म्हणजे तीन चाकी ई-वाहन उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अशा विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. त्या अंतर्गत, दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत शहरातील दिव्यांग व्यक्तींना फिरत्या तीन चाकी ई-वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. महापालिका हद्दीतील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.

योजनेचा लाभ घेण्यासाठी...

लाभार्थींनी www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी, शर्ती आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहितीदेखील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये या योजनेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृती उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.

लाभार्थींसाठी नियम-अटी

दिव्यांग लाभार्थीचे किमान तीन वर्षे शहरात वास्तव्य असावे

लाभार्थीचे नाव असलेले स्वतःची किंवा कुटुंबाची शिधापत्रिका असावी

पासपोर्ट, स्वतः किंवा पालकांच्या नावे असलेली मिळकतकर पावती किंवा वीज बिल

ऑनलाइन अर्ज भरताना लाभार्थीचे मूळ आधारकार्ड, मतदार ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक

लाभार्थीचे किमान ४० टक्के दिव्यांगत्वाचे यूडीआयडी कार्ड अपलोड करणे आवश्यक

लाभार्थीचा वाहन चालविण्याचा परवाना अपलोड करणे आवश्यक

लाभार्थीचे हॉकर्स प्रमाणपत्र किंवा हॉकर्स सर्व्हेमध्ये नोंद असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक

दिव्यांग लाभार्थीने संबंधित दुकानदाराकडील ई-वाहनाचे मूळ कोटेशन अपलोड करणे आवश्यक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest