संग्रहित छायाचित्र
पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द व्हावा म्हणून स्थानिक रहिवाशी कित्येक वर्षापासून पाठपुरावा करत होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने कचरा डेपो रद्द झाला. मात्र, त्या जागेवर आता ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुनावळे, ताथवडेसह परिसरातील नागरिकांना शुध्द हवा मिळण्यास मदत होईल. या ऑक्सीजन पार्कमुळे प्रदूषणात घुसमटलेल्या शहरवासीयांना आरोग्यदायी वातावरण अनुभवता येणार आहे.
पुनावळे येथे नियोजित कचरा डेपोच्या प्रश्नासंदर्भात मागील १५ वर्षांपासून स्थानिक रहिवाशांचा संघर्ष सुरू होता. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा कचरा डेपो प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी सातत्यपूर्ण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्या संदर्भात राज्य शासन गंभीर होते.
मात्र, लक्ष्मण जगताप यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आमदार अश्विनी जगताप यांनी कचरा डेपोबाबत विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले. कचरा डेपोचा प्रकल्प रद्द झाला. विशेष म्हणजे या कचरा डेपोच्या जागी आमदार अश्विनी जगताप यांनी ऑक्सिजन पार्क प्रकल्प उभारण्याची मागणी केली. त्यासंदर्भात यशस्वी पाठपुरावा केला. अखेर या प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. त्यासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या ऑक्सिजन पार्कमुळे पुनावळे गावच्या लौकिकात भर पडणार आहे.
अत्यंत आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित म्हणजेच ‘ऑक्सिजन पार्क’ आकार घेणार आहे. पुनावळे येथे सुमारे कचरा डेपो क्षेत्रावर उद्यान साकारण्यात येत आहे. या प्रकल्पात देशी झाडे लावण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, खुली व्यायामशाळा अशा अन्य सुविधा करण्यात येणार आहे. रस्त्यालगत लिंब, वड, पिंपळ अशी देशी झाडे लावण्यात येणार आहे.
पुनावळे, ताथवडे परिसराचा चेहरा बदलणार
पुनावळे, ताथवडे भागातील रस्ते, ड्रेनेज, पदपथ, विद्युत पथदिव्ये यासह विविध कामे सुरु आहेत. त्याशिवाय १२ मीटर आणि १८ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, पावसाळी पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्टॉर्म वॉटर लाईनची कामे, नागरिकांना रस्त्याने व्यवस्थित चालता यावे. यासाठी पदपथ, सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीचे पोल, टी जंक्शन येथे वाहतूक बेटाची निर्मिती आणि सुशोभीकरणाची कामे ही सर्व विकासकामे सुरु आहेत. गावातील कोणत्याही शेतकऱ्याचे अथवा ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेत पुनावळे गावाच्या विकासाचा आलेख असाच चढता राहील, यासाठी मी देखील आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीन, अशी ग्वाही शंकर जगताप यांनी ग्रामस्थांना दिली.