IND W vs IRE W 1st ODI Toss update...
IND W vs IRE W 1st ODI 2025 : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज (10 जानेवारी ,शुक्रवार)सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे थोड्याच वेळात सुरू होणार आहे.
🚨 Toss Update from Rajkot 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) January 10, 2025
Ireland have elected to bat against #TeamIndia in the first #INDvIRE ODI.
UPDATES ▶️ https://t.co/bcSIVpjnlo@IDFCFIRSTBank pic.twitter.com/1F1k0mLJRA
तत्पूर्वी, पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेला नाणेफेकीचा कौल हा आयर्लंड महिला संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार गॅबी लुईसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय महिला संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरतील.
भारत महिला विरुद्ध आयर्लंड महिला यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 26 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी खूपच प्रभावी राहिली आहे. टीम इंडियाने 26 पैकी 21 सामने जिंकले आहेत, जे त्यांची मजबूत आघाडी स्पष्टपणे दर्शवते. दुसरीकडे, आयर्लंड महिला संघाने पाच सामने जिंकले आहेत. हे आकडे भारतीय संघाचे श्रेष्ठत्व स्पष्टपणे प्रतिबिंबित करतात, जे त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचा पुरावा आहे.
आयर्लंड महिला विरुद्ध भारत महिला पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन :
भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ : स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सतघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, तितस साधू.
आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ : सारा फोर्ब्स, गैबी लुईस (कर्णधआर), ऊना रेमंड-होए, ओर्ला प्रेंडरगैस्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, कूल्टर रीली (विकेटकीपर), अर्लीन केली, जॉर्जीना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट, एमी मैगुइरे.