तृप्ती देसाई
“भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे काही अश्लील चाळे करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याची सत्यता तपासणे गरजेचेच आहे. परंतु जेव्हा २ डझनपेक्षा अधिक व्हिडीओ समोर येतात, तेव्हा किरीट सोमय्या यांचे व्यक्तिमत्त्व काय आहे? चारित्र्य, अश्लीलता जेव्हा समोर येते तेव्हा एक सनक डोक्यात जाते. इतर नेत्यांचे व्हिडीओ समोर आल्यानंतर आवाज उठवणारा आंदोलन करणारा भाजपा आता किरीट सोमय्या यांची हकालपट्टी करणार आहे का ?” असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांचे काही अश्लील चाळे करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून अडचणीत आणणारे सोमय्या स्वतः अडचणीत सापडले आहेत. सोमय्या यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्थरातून त्यांच्यावर टीका होत आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, “भाजपचे रोखठोक नेते आणि भ्रष्टाचार विरोधी नेते म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे पहिले जाते. परंतु त्यांचेच काही अश्लिल चाळे करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. अधिवेशन सुरु आहे गृहमंत्री हे भाजपचे असली तरी सखोल चौकशी करून कायदेशीर करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस देणार आहेत का ? असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी गृहमंत्र्यांना केला आहे.”
पुढे बोलताना देसाई म्हणाल्या की, “किरीट सोमय्या तुम्ही जेव्हा दुसऱ्यांकडे बोट दाखवले तेव्हा स्वतःकडे चार बोट होती. आपण सुद्धा अशा घाणेरड्या व्यक्तिमहत्वाचे आहोत, अश्लील चाळे करणारे आहोत हे जेव्हा जगासमोर येत तेव्हा तुमच्याविषयी असणारी थोडीफार आस्था ती पूर्णपणे धुळीस मिळवली आहे. इतर प्रकरणात जसे बोलता तसेच या व्हिडीओमध्ये तुम्ही नेमके काय करत आहात हे रोखठोक सांगा अन्यथा तुम्ही कोकणात जो हातोडा घेऊन गेला होता तोच हातोडा घेऊन आम्हाला मंत्रालयात यावे लागेल.”
किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
या सगळ्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर आता किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, असं सांगताना त्यांनी होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गृहमंत्री फडणवीस यांनी माझी चौकशी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.