वळसे- पाटलांची दिलगिरी, पण अजित पवारांनी शरद पवारांना डिवचले

सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून दिलगिरी व्यक्त करीत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. मात्र, यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना डिवचले असून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही? असा सवाल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 21 Aug 2023
  • 06:41 pm

Ajit Pawar : वळसे- पाटलांची दिलगिरी, पण अजित पवारांनी शरद पवारांना डिवचले

सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून दिलगिरी व्यक्त करीत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. मात्र, यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना डिवचले असून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही? असा सवाल केला आहे.

शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशी टीका वळसे पाटील यांनी केली होती. त्यावरून शरद पवार गटाने ‘कृतघ्न’ म्हणत त्यांच्यावर टीका केली. वळसे पाटील यांनीही दिलगिरी व्यक्त केली. मात्र, आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करीत आपण  वळसे पाटील यांच्या पाठिशी ठाम उभे असल्याचे दाखवून दिले आहे.

 

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या (अजित पवार गट) अधिकृत ट्विटर हँडलवर अजित पवार यांनी म्हटले आहे की, नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली, विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठींबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे.

पुढच्या टि्वटमध्ये अम्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या बळावर पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणली. अरविंद केजरीवालांनी दोन राज्यात सत्ता स्थापन केली. नीतिश कुमारांनी बिहारमध्ये वर्चस्व स्थापन केलं आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू, वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी स्वबळावर सत्ता आणली. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांनी एकहाती सत्ता स्थापन केली. मात्र, या सर्वांमध्ये आदरणीय शरद पवार साहेब हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ वर्षांच्या इतिहासात पक्षाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही, याबाबतची खंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त केली होती. आपण याबाबत आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही, अशी विचारणा त्यांनी व्यासपीठावरून केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest