सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा
जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिली. सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती कऱण्यात आल्याची माहिती दिली.
एका आयोजित पत्रकार परिषदेत पटेल यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना पटेल म्हणाले आहेत की, ''पक्षाने मला अधिकृत रितीने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी सप्टेंबर २०२२ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो.''
ते म्हणाले, ''जयंत पाटील यांची नियुक्ती आम्ही केली होती. संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती. तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. आम्ही आता जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करत आहोत. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत.''