"संज्या ओढतो गांजा", राऊतांच्या ‘त्या’ कृतीमुळे पुण्यात शिवसैनिक आक्रमक

संजय राऊत माध्यमांशी बोलताना थुंकले याच्याच निषेधार्थ आज पुण्यातील गुडलक चौक येथे शिवसेनेकडून राऊतांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी संज्या ओढतो गांजा, अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Sat, 3 Jun 2023
  • 01:33 pm
Shiv Sainik : "संज्या ओढतो गांजा", राऊतांच्या ‘त्या’ कृतीमुळे पुण्यात शिवसैनिक आक्रमक

पुण्यात शिवसैनिक आक्रमक

संजय राऊत आम्ही राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात फिरून देणार नाही

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अनेकदा आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता आणखी एकदा माध्यमांशी बोलताना संजय राऊतांचा थुंकल्याच्या व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना थुंकले याच्याच निषेधार्थ आज पुण्यातील गुडलक चौक येथे शिवसेनेकडून राऊतांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी संज्या ओढतो गांजा, अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्यासारख्या वाचाळ विरांचा आम्ही निशेध करतो. संजय राऊत यांनी केलेले कृत्य हे घृणास्पद असून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम ते करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे किरण साळी यांनी केला आहे. तर संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देखील यावेळी आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी दिला.

मुंबई येथे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावेळी उत्तरावर प्रतिक्रिया न देता ते थुंकले. याच्या निषोधार्थ शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे देखील या आंदोलनात मारण्यात आले.  या आंदोलनात बँनरवरील फोटोवर पान खावून थुंकत निषेध केला. संज्या ओढतो गांजा मजकूराचे बँनर या आंदोलनात झळकत होते. संजय राऊत हे माध्यमांशी बोलताना थुंकल्याचा आरोप करत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest