पुण्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
राज्याचे मुख्यमंत्री, लोकनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. पुण्यातील सारसबागेजवळील शिवसेनाभवन येथे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिवसेंदिवस गळती लागत असल्याचे चित्र आहे. अनके दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अशातच पुण्यात देखील शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला. येणाऱ्या काळात पुण्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात कार्य करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे अभिजीत बोराटे, ओंकार गायकवाड, अजय होले, खन्नासिंग कल्याणी, व्यंकटेश भंडारी, कृष्णा भोसले यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.