मोदींचा निषेध करण्यासाठी विरोधकांचे आंदोलन सुरू
लोकमान्य टिळक पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान होणार आहे. मात्र, हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देऊ नये, असा विरोध करत महाविकास आघाडील पक्ष तसेच सम विचार पक्ष यांच्याकडून केला जात आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरापासून २०० मीटर अंतरावर निषेध व्यक्त केला जात आहे. प्राईम मिनिस्टर आहेत की क्राईम मिनिस्टर आहेत ? असे नामफलक घेऊन विरोधकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात देशभरातून आक्रोश केला जात आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन तिथे पाहणी करावी, अशी मागणी यांच्याकडून केली जात आहे. दरम्यान, कालच पुणे पोलीसांकडून विरोधी पक्षातीला अनेकांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तरी देखील विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. काळे झेंडे आणि काळे कपडे घालून निषेध केला जात आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (शरद पवार गट) म्हणाले की, “पुणे पोलीस पंतप्रधान कार्यालयाच्या किंवा केंद्र सरकारच्या अंडर प्रेशन आलेले आहेत. पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलन कोणी करू नये, असा पुणे पोलीसांचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. निषेध व्यक्त करून आणि आंदोनल करून आम्ही त्यांचे पुण्यात स्वागत केले जाईल. मणिपूर जळत असताना, तेथील महिलांवर अत्याचार होत असताना, त्यांची सुरक्षा करण्याऐवजी मोदींना पुरस्कार महत्वाचा वाटत असेल. तर या पंतप्रधानांना निषेध व्यक्त करून आणि घोषणा ऐकूनच पुढे सोडावे लागणार आहे.”