पंतप्रधान मोदी दगडूशेठ मंदीरात दाखल, बाप्पाच्या जयघोषात नागरिकांची तुफास गर्दी

सध्या पंतप्रधान मोदी हे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पोहचले असून त्यांच्या हस्ते गणेशाच्या अभिषेकाला प्रारंभ झाला आहे. यावेळी पुणेकरांना तुफान गर्दी केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 1 Aug 2023
  • 12:03 pm
Prime Minister Modi : पंतप्रधान मोदी दगडूशेठ मंदीरात दाखल, बाप्पाच्या जयघोषात नागरिकांची तुफास गर्दी

पंतप्रधान मोदी दगडूशेठ मंदीरात दाखल, बाप्पाच्या जयघोषात नागरिकांची तुफास गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीत फुट पाडल्यानंतर आज शरद पवार आणि नरेंद्र मोदी तसेच अजित पवार, देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर असणार आहेत. सध्या पंतप्रधान मोदी हे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पोहचले असून त्यांच्या हस्ते गणेशाच्या अभिषेकाला प्रारंभ झाला आहे. यावेळी पुणेकरांना तुफान गर्दी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पुण्यात दाखल झालेत. तसेच आता ते दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात पोहचलेत. मोदींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उफाळली आहे. नागरिकांकडून गणपती बाप्पाचा जयघोष केला जात आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासोबतच पिंपरी-चिंचवड ते पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद बनवणाऱ्या नवीन मेट्रो रेल्वे लाईनच्या विस्ताराचे उद्घाटनही ते करणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest