प्रशांत जगतापांचं मणिपूरमध्ये हटके रक्षाबंधन सेलिब्रेशन; पुणेकरांच्या वतीने दिले 'हे' खास रक्षाबंधन गिफ्ट

बहिण भावाच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दिवसाला आणखी खास करण्यासाठी अनेकजण सैनिकांना राख्या पाठवता, तर कोणी सामाजिक कार्यातून या सणाला उजाळा देतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 30 Aug 2023
  • 04:05 pm
Prashant Jagtap Rakshabandhan

प्रशांत जगतापांचं हटके रक्षाबंधन सेलिब्रेशन

बहिण भावाच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दिवसाला आणखी खास करण्यासाठी अनेकजण सैनिकांना राख्या पाठवता, तर कोणी सामाजिक कार्यातून या सणाला उजाळा देतात. दरम्यान पुण्याचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मणिपूरमध्ये जाऊन रक्षाबंधन हा सण साजरा केला. यावेळी जगताप यांनी रक्षाबंधनाची भेट म्हणून पुणेकराच्या वतीने २ गावे, २ पुनर्सवसन केंद्रात १ महीना पुरेल एवढा धान्यसाठा, सर्वाकरिता नवीन कपड़े, मेडिसिन आणि जिवणावश्यक वस्तु देवून हा सण साजरा केला. 

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले, मी माझ्याआयुष्यातील एक पवित्र आणि अतिशय सवेंदशील सामाजिक कार्य करण्याकरीता आज मणिपुर येथे आलो आहे. येथिल सर्व लोकाकारिता विषेशता महिलाभगिनींकरीता रक्षाबंधनाची भेट म्हणून पुणेकराच्या वतीने २ गावे, २ पुनर्सवसन केंद्र यांना १ महीना पुरेल एवढा धान्यसाठा, सर्वाकरिता नवीन कपड़े, मेडिसिन आणि खुप काही वस्तु देवून आज खरे रक्षाबंधन साज़रे करणार आहोत. आपण सर्व भारतीय मणिपुरच्या जनतेबरोबर आहोत आणि महाराष्ट्रची सामाजिक कार्यकर्ते एक वेगळी रक्षाबंधनाची भेट देवू शकतात हा संदेश देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest