पोलीसाला मारहाण प्रकरण : राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी डॉ. वंदना मोहिते यांनी कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणी वंदना मोहिते यांना यवत पोलीसांनी अटक केली होती. आता वंदना मोहिते यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 17 Jun 2023
  • 04:42 pm
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

यवत पोलीसांनी वंदना मोहिते यांना केली होती राहत्या घरातून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी डॉ. वंदना मोहिते यांनी कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणी वंदना मोहिते यांना यवत पोलीसांनी अटक केली होती. आता वंदना मोहिते यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वंदना मोहिते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघ डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आहेत. १५ जून रोजी पंढरपूर आषाढी वारीनिमित्त पुणे जिल्यातील यवत परिसरात कासुर्डी येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सदर मार्गावरून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलीस नाईक नितीन कोहक हे त्यांच्या सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी त्यांचे कर्तव्य बजावत होते. दरम्यान वंदना मोहिते या एका कारमध्ये त्या ठिकाणी आल्या. पुण्याकडे जाण्यावरून त्यांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसोबत वाद घातला.

वाद वाढल्यावर डॉ. वंदना मोहिते यांनी पोलीस कर्मचारी नितीन कोहक यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर गाडीतून खाली उतरत त्यांनी बॅरिकेड जबरदस्तीने बाजूला केले आणि त्या निघून गेल्या. यवत पोलिसांनी याबाबत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी वंदना मोहिते यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वंदना मोहिते यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मोहिते यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest