अजितदादांवर आमचं प्रेम, पण शरद पवारांना सोडून जाणार नाही - प्रशांत जगताप

“पुण्यातील सर्व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि उद्याही असू”, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Mon, 3 Jul 2023
  • 12:56 pm
Ajit pawar : अजितदादांवर आमचं प्रेम, पण शरद पवारांना सोडून जाणार नाही - प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

मोदी बागेतून प्रशांत जगतापांनी साधला पत्रकारांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी ४० आमदारांना सोबत घेऊन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. असे असताना आता कार्यकर्त्यांमध्ये मात्र भ्रम निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. आज शरद पवार यांच्या मोदी बाग येथील निवासस्थानी सर्व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपली बाजू समोर ठेवली आहे. मी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे पत्रकारांना त्यांनी सांगितले आहे.

पुण्यातील सर्व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत असणार आहेत. आम्ही सर्वजण शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि उद्याही असू, असा विश्वास प्रशांत जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मागच्या २४ ते २५ वर्षांपासून अनेक कार्यकर्ते हे आरएसएस आणि भाजपच्या विचारांविरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले आहेत. गेले २४ वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यासाठी लढत आलो, अशा परिस्थितीमध्ये दादांवर जरी आमचे प्रेम असले तरीही आम्ही शरद पवार यांना सोडून जाण्याचा विचार करत नाही. तसेच कुठलाच कार्यकर्ता असा विचार करत नाही, असे यावेळी प्रशांत जगताप म्हणाले.

Share this story

Latest