केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल
पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातील नीरा नदी प्रदुषित झाली आहे. अशातच सोमवारपासुन (दि. ५) केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान सोमवारी सांयकाळी पटेल यांनी सोनगांव येथील सोनेश्वराचे दर्शन घेतले. तसेच निरा नदीची पाहणी केली. यावेळी नीरा नदीच्या प्रदुषणाबाबत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
पटेल यांनी केलेल्या नदीच्या पाहणीदरम्यान नीरा नदीत बारामती तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने, तसेच फलटण तालुक्यातील कत्तलखाण्याचे दूषित पाणी हे नीरा नदीत सोडल्याचा आरोप नदीकाठच्या ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभुमीवर पटेल यांनी बारामती तालुक्यातील निरावागज येथे गावभेट दौऱ्यात बोलताना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.
पुणे जिले के बारामती क्षेत्र में नीरा नदी के प्रदूषण को लेकर किसानों,जनप्रतिनिधियों और पार्टी पदाधिकारियों ने गंभीर शिकायत की थी ।मैने केन्द्र से @CWCOfficial_GoI की टीम भेजी थी उस टीम के साथ राज्य सरकार के अधिकारी भी थे ।टीम ने प्रारंभिक रिपोर्ट की जानकारी दी है @PMOIndia pic.twitter.com/fPTweso3RJ
— Prahlad Singh Patel (@prahladspatel) June 5, 2023
पटेल म्हणाले की, “पाण्याचा 'रिपोर्ट' सात दिवसात येईल. जमिनीतील पाणी खराब झाले आहे का याची देखील माहिती घ्यावी लागेल. दूषित पाण्यामुळे पंजाबमधून कॅन्सर ट्रेन सुरु झाली. नदीत दूषित पाणी जावू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. नदीचे सगळ्यात नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे. त्यामुळे प्रदुषणाबाबत कारवाई कशी केली जाईल, हे सांगू शकत नाही. पण संकेत मात्र देऊ शकतो.”